दि. २७/०७/२०१८ गुरुपौर्णिमा उत्सव
प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे महत्व अनन्य साधारण राहिले आहे. " गुरु बिना ज्ञान नही " कोणतेही शास्त्र, कला, विद्या आपण गुरूशिवाय प्राप्त करू शकत नाही. आज इंटरनेटच्या युगातही गुरुचे महत्व आहे. या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, गुरूऋण व्यक्त करण्यासाठी गुरूंना विद्यार्थी वंदन करतात. एखादे फुल देऊन आपल्या भावना व्यक्त करतात.
गुरुचे महत्व, गुरु शिष्य परंपरा याविषयावर मुलांना भाषण करण्यासाठी सांगितले जाते. विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करतात.
गुरुविषयी आदरभाव बाळगण्यासाठी जाणीवपूर्वक हा उपक्रम राबविला जातो.