वृक्ष लावा, वृक्ष वाढवा, प्रदूषण टाळा
दि. २०/०७/२०१८ रोजी शाळेच्या परिसरात व मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात वृक्षारोपण केले. प्राचीन भारतीय संस्कृतीचा विकास ऋषी मुनींनी झाडाखाली बसून केला. आजच्या मानवाच्या विकासामुळे वनसंपत्ती संपत आहे. झाडे, वने, जंगले यांना नष्ट करून माणूस विकास करत आहे. पण त्याचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. प्रदूषणात वाढ होत आहे. पर्जन्यमान कमी होत आहे. अन्नधान्याचा, पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. जंगलसंपत्ती नष्ट होत असून पशु पक्ष्यांचा आसरा नष्ट होत आहे. निसर्ग संतुलन राहिले नाही.