Posted on: Sat, 11/10/2018 - 21:36 By: Anonymous (not verified)
Ganesh Murti Making Training Workshop

03/08/2018 पर्यावरण पूरक गणेशमूर्ती

मुक्तांगण शाळेत विद्यार्थ्यांसाठी जाणीव पूर्वक मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. बाजारातील तयार गणेशमूर्ती घरी आणून तिची स्थापना या करता मातीच्या गणेशमूर्ती स्वतः तयार करून मुलांनी घरी बसवाव्या यासाठी प्रबोधन करण्यात आले. व मातीच्या गणेशमूर्ती घरोघर विद्यार्थ्यांनी बसविण्याचा संकल्प केला.

दरवर्षी गणेशमूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन करून पाणी प्रदूषित होत आहे. सध्या मराठवाड्यात अवर्षणग्रस्त परिस्थिती असून नद्या, धरणे कोरडी पडत आहेत. विहिरीचे पाणी कमी होत आहे. यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यातच आहे ते जलसाठे वाचवण्यासाठी, पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी आपण मातीच्या गणेशमूर्ती बनवून त्या आपल्या घरासमोरच्या बागेत कुंडीत किंवा शेतामध्ये विसर्जित कराव्या अशा प्रकारच्या संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आला.