दि. २०/०७/२०१८ रोजी शाळेच्या परिसरात व मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात वृक्षारोपण केले. प्राचीन भारतीय संस्कृतीचा विकास ऋषी मुनींनी झाडाखाली बसून केला. आजच्या मानवाच्या विकासामुळे वनसंपत्ती संपत आहे. झाडे, वने, जंगले यांना नष्ट करून माणूस विकास करत आहे. पण त्याचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. प्रदूषणात वाढ होत आहे. पर्जन्यमान कमी होत आहे. अन्नधान्याचा, पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. जंगलसंपत्ती नष्ट होत असून पशु पक्ष्यांचा आसरा नष्ट होत आहे. निसर्ग संतुलन राहिले नाही.
यासाठी शाळेतर्फे झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.या वाढत्या वयाच्यामुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शुद्ध हवा, पाणी, मिळण्यासाठी झाडांची, जंगलांची नितांत गरज आहे. म्हणून मुलांना यामध्ये सामील करून घेतले असून एका विद्यार्थाला एक झाड संगोपनासाठी वृक्ष संवर्धनासाठी देण्यात आले आहे. त्याची काळजी त्यांनी घ्यावी असा संकल्प केला आहे.
शहरातील इतर लोकांनाही झाडाचे, वृक्ष संवर्धनाचे महत्व समजावण्यासाठी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्ष संवर्धन करा. असा संदेश मुलांनी वृक्ष दिंडीच्या माध्यमातून दिला. झाडे लावा, झाडे जगावा, वृक्ष संवर्धन करा, प्रदूषण टाळा अशा घोषणा देत घोषणा फलक मुलांनी घेऊन दिंडी काढली.
"कावळा म्हणतो काव काव
माणसा माणसा एक तरी झाड लाव"
मुलांचे भावी आयुष्य सुखाचे जाण्यासाठी 'वृक्ष लावा' चा संदेश मुलांच्या मनावर बिंबविण्यात आला.